Friday, 30 November 2018

आता तुझी "पाळी"!!!


                कालच सुप्रीम कोर्टाचा निकाल शबरिमाला मंदिरात १० ते ५० वयाच्या स्त्रियांना असलेली प्रवेशबंदी उठवून ऐतिहासिक ठरला.कोर्ट म्हणाल की केवळ एक स्त्री म्हणून प्रवेश नाकारणे चुकीचे आहे.पण सांगू का ही प्रवेशबदी केवळ स्त्री म्हणून नव्हती तर १० ते ५० वयोगटातल्या स्त्रीला असणारी निसर्गदत्त देणगी ( ज्याला केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही problem म्हणतात) होती.
               तथा कथित भक्तांच्या मते जेव्हा स्त्रीला periods येतात त्या काळात ती अपवित्र बनते आणि तिच्या प्रवेशामुळे मंदिरही.मला निसर्गाबद्दल राग ही येतो आणि प्रश्नही पडतो.एका स्त्रीला अपवित्र करणारी गोष्ट मजबुरीने का दिली असेल.पण लगेच दुसरा प्रश्न स्वताच्या अस्तित्वाबददल पडतो की जर मासिक पाळी नसती तर मी जन्माला आलो असतो काय. आणि जर या गोष्टीमुळे  मी जन्माला आलो असेन तर मी देखील अपावित्र
               जर खरंच पलीतल्या स्त्रियांना प्रवेशबंदी करायची तर काही स्त्रियांना ५० नंतरही येतेच.आणि काही स्त्रियांना कधीच येत नाही...  !!! मग कुठल्या वयोगटातल्या स्त्रीला प्रवेश नाकारणार...
              अभांगमध्ये तुकोबाराय सांगून गेले की देव चराचरात आहे.या चराचरी देवाचा concept घेत माडगूळकर देखील म्हणाले
         " देव अंतरात नांदे,देव दाही दिशी कोंदे,
           देव आभाळी सागरी,देव आहे चराचरी,
           देव शोधूनिया पाही देव सर्वाभात ठायी...!!!"
मग जर देव चराचरात असेल तर तुम्ही स्त्रीला देवदर्शन घेण्यापासून कसे रोखणार?
           आणि हो देव अपवित्र होईल म्हणता पण स्वतः पवित्र राहण्यासाठी म्हणून काय या देवाने आचारसंहिता पाळायला नको?
त्या सुर्यादेवणे आपली किरणे आणि वरून देवाने आपल्या धारा मासिक पाळी असलेल्या स्त्रीच्या अंगावर न बरसावलेल्याच बर्या..!!
             हनुमान हा ब्रह्मचारी आहे आणि म्हणून त्याच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश बंदी आहे का तर त्या आपल्या सख्याच्या नजरेने त्याला बघतील...
पण जर एक lesbian आणि एक गे दर्शनाला आला तर तुम्ही कोणाला अडवणार  आणि कोणाला सोडणार...!!!
             मी एक नास्तिक आहे पण जरी देवाला मानत असतो तरी मला हेच वाटलं असतं की अशा किरकोळ कारणावरून पवित्रता भंग व्हावा इतके वाईट दिवस आलेले नाहीत आणि जर आले असतील तर त्याच रक्षण करायला तो समर्थ आहे....!!!!
myviews09007.blogspot.com

No comments:

Post a Comment