Posts

Showing posts from June, 2019

आजी आजोबांच्या सावलीत

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली . कुण्या साहित्यिकांन सांगितलेलं की पत्नी ही आई बहिणींची जागा भरून काढते पण इथे तर पत्नीला आई होताना मी बघितलं. माझ्या लहानपणी आजोबा आजारीच असायचे पण मी लहान असल्याने दंगा करायचो .त्यामुळे आज्जीला दोघांचा त्रास व्हायचा. मी आजीला न सांगता झाडाच्या चिंचा काढायला ,कधी सुगरणीचा खोपा काढायला विहिरीवर जायचो.माझी आई शिक्षिका असल्याने आजोबांच्या आजारपणात माझ्या संगोपनाची दुहेरी जबाबदारी आज्जीवर होती.त्याचा तिला त्रास झाला पण कधी बोलली नाही. मी इतका…