".... आणि काय हवं!!!" ".......ani kay hava!!!"

            जुई आणि साकेत खरंच amazing आहेत. जेव्हा मी त्यांचं आयुष्य ' आणि काय हवं" या webseries मध्ये बघत होतो त्यावेळी अस वाटायचं की आपलं आयुष्यही अगदी असाच असावं अस वाटायचं. तुम्ही म्हणाल हे series बघून असा विचार करणं म्हणजे वेडेपणा आहे खरं आयुष्य वेगळं असतं. पण तुम्ही webseries बघाल तर समजेल की आपल्या प्रतेकमधे एक जुई आणि साकेत दडलेला असतो फक्त गरज आहे ती हातातला मोबाईल बाजूला ठेऊन नात्यावर नव्याने फुंकर घालण्याची....!!!
             ही webseries  मी एका दमात बघून काढली .साकेतने नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर दिलेलं लहानपणीच्या खेळण्याचं surprice amazing होत. प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणाच्या priceless आठवणी असतात. प्रत्येकाला वाटत असतं की आपण त्या जपायला हव्यात पण आपण त्या miss करतो. पण मी मात्र जपून ठेवल्यात.. किल्यावरच्या मावळ्यांच्या स्वरूपात...!!! कधी कधी बॉक्स उघडून त्यांना पाहताना बालपणाची झलक डोळ्यासमरुन जाते तेव्हा डोळ्यात पाणी उभे राहिल्याशिवाय राहत नाही.
               साकेत आणि माझ्यामध्ये आणखीन एक गोष्ट सारखी वाटली ती म्हणजे जसा त्याला त्याच्या प्रत्येक holiday destination मध्ये समुद्र हवा असतो तसा  मलाही समुद्र हवा असतो. समुद्र आणि माझं नातं मलाही कळलं नाही पण जेव्हा मी त्याची भेट घेतो तेव्हा माझ भरलेलं हृदय एका क्क्षणात हलकं झाल्यासारखं वाटत. आपली दुःख , थकवा सगळा काही गिळून टाकतो तो.... !!!
              साकेत जुईला लहानपणी खालेल्या पुरणपोळ्या इतक्या रंगवून सांगायचा की त्या दिवशी जुईने पुरणपोळ्या बनवून खायला घातल्या . तो प्रत्येक प्लॅन करायला तेवढंच उत्साही असतो( काहीसा अतीच..)....!!! गाडीचा स्क्राच घालवायला toothpaste लावण्याईतका बावळटपणा सुद‌धा तो करतो. बरेच प्लॅन त्याच्या अतिउत्साही पणामुळे फसतात पण त्या फसलेल्या ideas. तो केलेला वेडेपणा साजरा करून आयुष्यात आनंदी राहायचं ही  आनंदी जीवनाची किल्लीच जणू साकेत आणि जुई देतात...!!!
               लेखकाच्या लेखणीतून जादुमुळे काल्पनिक वाटणारी पात्रसुद्धा आपलीशी वाटू लागतात.... काय कमाल आणि काय बहार गोष्ट... आणि काय हव!!!!

Comments

Popular posts from this blog

Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

आरे जंगलातली हिरकणी #aarey #saveaarey #mumbai #nature Aarey Forest

Reintroduction of Big Cat in India...!!!