Posts

Showing posts from October, 2019

आरे जंगलातली हिरकणी #aarey #saveaarey #mumbai #nature Aarey Forest

परवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल.            हिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती. आपल्या महाराजांनी तिला साडीचोलीचा आहेर पण दिला होता.           मला अस वाटत की हिरकणी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्या मातांच म्हणजे फक्त मनुष्य जातितीलच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टी मधील की ज्या आपल्या बाळाला, पिल्लांना सोडून सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळी बाळाच्या ओढीने परत येतात.             अश्याच एका हिरकणी बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पण ही  होती झाडांवर चिवचिवाट करणारी  चिमणी. झाडाच्या डोली मध्ये तीच  घर होत.काही दिवसांपूर्वीच तिच्या अंड्यातून पिल्ल बाहेर आली होती. पण ती अगदी नवजात, कमजोर होती जी त्यांच्या आईशिवाय अपूर्ण होती.  तरीही तिला पिल्लांना आणि तिला खायला आणण्यासाठी घरट्याबहेर पडावेच लागायचे. ती सूर्य उजाडता ब…