आरे जंगलातली हिरकणी #aarey #saveaarey #mumbai #nature Aarey Forest

          परवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल. 
          हिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती. आपल्या महाराजांनी तिला साडीचोलीचा आहेर पण दिला होता.
          मला अस वाटत की हिरकणी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्या मातांच म्हणजे फक्त मनुष्य जातितीलच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टी मधील की ज्या आपल्या बाळाला, पिल्लांना सोडून सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळी बाळाच्या ओढीने परत येतात. 
           अश्याच एका हिरकणी बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पण ही  होती झाडांवर चिवचिवाट करणारी  चिमणी. झाडाच्या डोली मध्ये तीच  घर होत.काही दिवसांपूर्वीच तिच्या अंड्यातून पिल्ल बाहेर आली होती. पण ती अगदी नवजात, कमजोर होती जी त्यांच्या आईशिवाय अपूर्ण होती.  तरीही तिला पिल्लांना आणि तिला खायला आणण्यासाठी घरट्याबहेर पडावेच लागायचे. ती सूर्य उजाडता बाहेर पडायची आणि मावळतीला परत यायची .         
             कालचा दिनक्रम पण तसाच होता. संध्याकाळी पिलांना भरवून झोपण्याची तयारी केली आणि खूप दूर चाऱ्यासाठी गेल्यामुळे थकली पण होती. रात्र झाली तेव्हा जंगलात भयाण शांतता पसरलेली होती.मधून मधून रात्रीच्या वेळी बाहेर पडणारी वटवाघळे आवाज करून शांतता भंग करत होती. सगळं चांगलं चाललं होत. पण अस म्हणतात ना जेव्हा आपल्याला सगळं चांगलं चाललेलं आहे अस वाटत त्याचवेळी दबा धरून बसलेली संकट गिधडाप्रमाने झडप घालतात आणि होत्याच नव्हतं करून टाकतात.त्या रात्री पण तेच झालं .
           ती चिमणी पिल्लांना भरवून उद्या परत पहाटे घरतट्याबाहेर पडावे लागणार असा विचार करत गाढ झोपली होती. इतक्यात मोठमोठे आवाज येवू लागले... व्यांव व्यांव व्यांव व्यांव...!! झोपलेलं कुटुंब घाबरून जाग झालं . काय होतंय हे पाहायला ती चिमणी घरत्याबहेर पडली आणि त्या आवाजाच्या दिशेने गेली.जवळ जाईल तसा आवाज वाढू लागला आणि कर्कश होऊ लागला.तिथं तिला काही माणस गाडीतून उतरताना दिसली. त्यांच्या हातात टॉर्च आणि मोठं यंत्र होत. त्यांच्यातल्या एकाने टॉर्च जंगलाच्या दिशेने फिरवली तेव्हा तिच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्याच्या तीव्रतेने तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि ती खालच्या झुडपात पडली. काही क्षण जातात न जातात तोपर्यंत दुसरा कर्णकर्कश आवाज यायला लागला घरर  घरर घरर...अता मात्र ती घाबरली अंगातला प्राण एकतवून तिने हवेत झेप घेतली व घर जवळ केलं. पिल्लांना आपल्या पंखाखाली घेतलं. तो आवाज मोठा होत होता आणि प्रत्येक क्षणाला जमिनीवर काहीतरी आदळून हादरा बसायचा. ती चिमणी तशी धाडशी होती तिने पुन्हा काय चाललाय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला . ती परत आवाजाच्या दिशेने गेली आणि काय होतंय हे पाहण्यासाठी एका झाडावर बसायला गेली पण तेवढ्यात शेजारीच झाड तिच्या दिशेने जोरात आले.तिने त्या झाडाच्या जोरदार फटक्यातून स्वतःची सुटका करून घेतली पण त्या घटनेने ती इतकी घाबरलेली की पुढचा कित्येक वेळ आवाजाच्या विरूध्द दिशेला झेप घेत राहिली. 
            खूप दूर आली होती ती. एव्हाना तिने तीच झाड, त्यावरच घर तिची पिल्ल खूप मागे सोडली होती . जंगल संपायला आल तेव्हा एका झाडावर बसली. त्या तिथे असलेल्या दबक्यातल दोन घोट पाणी तिने पिले. पहाट झाली तेव्हा तिला दाना पाणी आणायला जायची आठवण झाली. पण तिने   आपल्या पिल्लांना बघून मगच दाना आणायला जाऊ असा विचार केला आणि ती आपल्या घरट्याकडे निघाली.
              जसजसे जवळ  तस तसे आडवी झालेली झाडे तिला दिसायला लागली म्हणून ती तीच घर जिथं होत त्या  जंगलाच्या भागात निघाली पण तिला सगळीकडे उभी झाडे आडवी झालेली दिसली. आता ती कासावीस झाली. तिला तीच घर सापडेना ती अख्या जंगलाला वळसा घालुन आली पण तिला तीच झाड सापडेना. तिला वाटलं आपण रस्ता चुकतोय की काय म्हणून ती पुन्हा शोधायला निघाली. पण इतक्यात तिला कालचा तो मशीन हातात धरलेला माणूस दिसला. आणि तिच्या लक्षात आलं की आपला पत्ता बरोबर आहे आणि जंगलही तेच आहे फरक इतकाच आहे त्या पडलेल्या हजारो झाडामध्ये एक झाड तिच होत. हा विचार येता तिच्या अंगाचा थरकाप उडाला. ती पिल्लांच्या आठवणीने कासावीस झाली . तिला घर हवं होत ,तिला पिल्ल हवी होती आणि तिला हे ही जाणून घ्यायचं होत की काल काय घडलं होत. पण त्या बिचारीला कोण सांगणार आरे जंगल पडलं होत....!!!

Comments

Popular posts from this blog

Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

Reintroduction of Big Cat in India...!!!